महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग मध्ये गट ड संवर्गातील शिपाई पदांच्या तब्बल 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येणार आहेत . या संदर्भात महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागांकडून अधिकृत्त जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . ( Maharashtra Department of Planning and Valuation Recruitment For Peon Post , Number of Post Vacancy – 125 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
| 01. | शिपाई | 125 |
संवर्ग ड मधील शिपाई या पदाकरीता सातव्या वेतनश्रेणीमधील वेतनस्तर एस 01 रुपये 15,000-46,600/- रुपये + इतर लागु असणारे वेतन व भत्ते ( महागाई भत्ता + घरभाडे + वाहन भत्ता ) या वेतनश्रेणीतील 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर शिपाई या पदाकरीता उमेदवार हे माध्यमिक शालांत परीक्षा ( SSC ) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय 18 वर्षे असावेत तसेच 38 वर्षापेक्षा जास्त नसावेत . यांमध्ये मागास प्रवर्ग / खेळाडू / आर्थिकद्ष्ट्या दुर्बल घटक / भुकंपग्रस्त उमेदवारांना वयोमर्यादामध्ये 05 वर्षांची शिथिलता देण्यात येईल .तर दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे इतकी असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमदु पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20.09.2023 पासून अर्ज सादर करण्यास उपलब्ध होईल . सदर पदभरती प्रक्रिया करीता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये तर राखीव प्रवर्गाकरीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !