महाराष्ट्र राज्‍य नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग मध्ये गट ड संवर्गात शिपाई पदांच्या 125 जागेसाठी महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग मध्ये गट ड संवर्गातील शिपाई पदांच्या तब्बल 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येणार आहेत . या संदर्भात महाराष्ट्र राज्य नगर रचना  आणि मुल्यनिर्धारण विभागांकडून अधिकृत्त जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . ( Maharashtra Department of Planning and Valuation Recruitment For Peon Post , Number of Post Vacancy – 125 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदाची संख्या
01.शिपाई125

संवर्ग ड मधील शिपाई या पदाकरीता सातव्या वेतनश्रेणीमधील वेतनस्तर एस 01 रुपये 15,000-46,600/- रुपये + इतर लागु असणारे वेतन व भत्ते ( महागाई भत्ता + घरभाडे + वाहन भत्ता ) या वेतनश्रेणीतील 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : मुंबई येथे विविध गट क संवर्गातील तब्बल 531 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर शिपाई या पदाकरीता उमेदवार हे माध्यमिक शालांत परीक्षा ( SSC ) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय 18 वर्षे असावेत तसेच 38 वर्षापेक्षा जास्त नसावेत . यांमध्ये मागास प्रवर्ग / खेळाडू / आर्थिकद्ष्ट्या दुर्बल घटक / भुकंपग्रस्त उमेदवारांना वयोमर्यादामध्ये 05 वर्षांची शिथिलता देण्यात येईल .तर दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे इतकी असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमदु पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20.09.2023 पासून अर्ज सादर करण्यास उपलब्ध होईल . सदर पदभरती प्रक्रिया करीता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये तर राखीव प्रवर्गाकरीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment