छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 114 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Chatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 114 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या 26 जागा , कनिष्ठ अभियंता ( तांत्रिक ) पदांच्या 07 जागा , कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) पदांच्या 10 जागा , लेखा परीक्षक ( गट क ) पदांच्या 01 जागा , लेखापाल पदांच्या 02 जागा , विद्युत पर्यवेक्षक पदांच्या 03 जागा , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक गट क पदांच्या 13 जागा , स्वच्छता निरीक्षक पदांच्या 07 जागा , पशुधन पर्यवेक्षक पदांच्या 02 जागा , प्रमुख अग्निशामक पदांच्या 09 जागा , उद्यान सहाय्यक पदांच्या 02 जागा कनिष्ठ लेखा परीक्षक पदांच्या 02 जागा , अग्निशामक पदांच्या 20 जागा , लेखा लिपिक पदांच्या 10 जागा अशा एकुण 114 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | 26 |
02. | कनिष्ठ अभियंता ( यांत्रिक ) | 07 |
03. | कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) | 10 |
04. | लेखा परीक्षक | 01 |
05. | लेखापाल | 02 |
06. | विद्युत पर्यवक्षक | 03 |
07. | स्थापत्य अभियांत्रिकी सहायक | 13 |
08. | स्वच्छता निरीक्षक | 07 |
09. | पशुधन पर्यवेक्षक | 02 |
10. | प्रमुख अग्निशामक | 09 |
11. | उद्यान सहाय्यक | 02 |
12. | कनिष्ठ लेखा परीक्षक | 02 |
13. | अग्निशामक | 20 |
14. | लेखा लिपिक | 10 |
एकुण पदांची संख्या | 114 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता , इतर व्यवसायिक पात्रता सविस्तर पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
हे पण वाचा : डाटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / टंकलेखक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती !
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये मागास प्रवर्ग / अनाथ उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/csmcvpaug23/ या संकेतस्थळावर दिनांक 12 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1,000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !