छ.संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 114 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 114 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Chatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 114 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या 26 जागा , कनिष्ठ अभियंता ( तांत्रिक ) पदांच्या 07 जागा , कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) पदांच्या 10 जागा , लेखा परीक्षक ( गट क ) पदांच्या 01 जागा , लेखापाल पदांच्या 02 जागा , विद्युत पर्यवेक्षक पदांच्या 03 जागा , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक गट क पदांच्या 13 जागा , स्वच्छता निरीक्षक पदांच्या 07 जागा , पशुधन पर्यवेक्षक पदांच्या 02 जागा , प्रमुख अग्निशामक पदांच्या 09 जागा , उद्यान सहाय्यक पदांच्या 02 जागा कनिष्ठ लेखा परीक्षक पदांच्या 02 जागा , अग्निशामक पदांच्या 20 जागा , लेखा लिपिक पदांच्या 10 जागा अशा एकुण 114 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )26
02.कनिष्ठ अभियंता ( यांत्रिक )07
03.कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल )10
04.लेखा परीक्षक01
05.लेखापाल02
06.विद्युत पर्यवक्षक03
07.स्थापत्य अभियांत्रिकी सहायक13
08.स्वच्छता निरीक्षक07
09.पशुधन पर्यवेक्षक02
10.प्रमुख अग्निशामक09
11.उद्यान सहाय्यक02
12.कनिष्ठ लेखा परीक्षक02
13.अग्निशामक20
14.लेखा लिपिक10
 एकुण पदांची संख्या114

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता , इतर व्यवसायिक पात्रता सविस्तर पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

हे पण वाचा : डाटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / टंकलेखक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती !

वयोमर्यादा :  उमेदवाराचे वय दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये मागास प्रवर्ग / अनाथ उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/csmcvpaug23/  या संकेतस्थळावर दिनांक 12 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1,000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment