तंत्रशिक्षण संचालनालय मध्ये संचालक , लिपिक , लघुलेखक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Directorate Of Technical Education Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 42 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हत या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.लघुलेखक : लघुलेखक पदांच्या 06 जागांसाठी पदभरत प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .त्याचबरोबर मराठी लघुलेखनाचा किमान वेग हा 100 श.प्र.मि तर इंग्रजी टंकलेखनाचा किमान वेग हा 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान वेग हा 30 श.प्रति मिनिट असणार आहे .
02.वरिष्ठ लिपिक : वरिष्ठ लिपिक या पदांच्या 29 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच मराठी 30 श.प्र.मि वेगमर्यादा तर इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट वेग असणारे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहेत .
03.संचालक : संचालक पदांच्या 07 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत अभियांत्रिकी / अणुविद्युत व दुरसंचारण अभियांत्रिकी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/ या संकेतस्थळावर दिनांक 21 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1,000/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..