नॉर्थर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1140 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Northenrn Coalfields Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 1140 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 13 |
| 02. | इलेक्ट्रीशियन | 370 |
| 03. | फिटर | 543 |
| 04. | वेल्डर | 155 |
| 05. | मोटार मेकॅनिक | 47 |
| 06. | ऑटो इलेक्ट्रिशियन | 12 |
| एकुण पदांची संख्या | 1140 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे मॅट्रिक ( SSC ) अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय टपाल विमा मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 26 वर्षाांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग ( SC / ST ) प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीत वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nclcil.in/detail/853989/apprenticeship-training या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर महाभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क स्विकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मीरा भाईंदर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती .