भारतीय टपाल विमा मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय टपाल विमा मध्ये इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Postal Life Insurance Mumbai Recruitment For Agent ) पदनाम , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये अभिकर्ता  ( Agent ) पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यता प्राप्त केंद्रीय किंवा राज्य शासनांच्या बोर्ड / संस्था मधून इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .त्याचबरोबर उमेदवारांस विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच कमाल वयोमर्यादाची अट असणार नाही .

हे पण वाचा : NCL : नॉर्थर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1140 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रवर अधिक्षक टपाल जीवन विमा विभाग , मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय नंदा पाटकर मार्ग विलेपार्ले पुर्व मुंबई 400057 या पत्यावर दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क / परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment