नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी सेंद्रिय शेतीची संपूर्ण माहिती पाहणार आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहे की सेंद्रिय शेती म्हणजे काय राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत योजनेअंतर्गत सन 2020/22 वर्षासाठी शासन अनुदान माहिती. सेंद्रिय शेतीचे उपयोग कोणकोणते आहेत आणि सेंद्रिय आणि रासायनिक शेती पद्धती सेंद्रिय शेती कोणकोणत्या तत्त्वावर आधारित आहे. या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत.
सेंद्रिय शेती म्हणजे काय ?
नैसर्गिक संसाधनांचा वापर करून औषधे, खते तयार करणे व पारंपारिक यांचा वापर करून केलेली विषुववृत्त रसायनिक खते औषधे यांचा वापर टाळून करण्यात आलेल्या शेती सेंद्रिय शेती असे म्हणतात. सेंद्रिय शेतीमुळे निसर्गाला कोणतीही हानी होत नाही व हे पूर्णपणे जैविक असते.
हरितक्रांतीच्या अगोदरच्या काळात पूर्वी लोकं केवळ शेणखत वापरत असत. सेंद्रिय शेती म्हणजेच परंपरागत किंवा पारंपारिक आलेली शेती पद्धत होय. सेंद्रिय शेतीमध्ये आपण रासायनिक खते आणि औषधांचा वापर न करता तर त्यामध्ये अवशेष गोमूत्र कुजलेल्या इतर पदार्थ अशा नैसर्गिक संसाधनाचा वापर करून केली जाणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय………
राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत योजनेअंतर्गत शासन अनुदान माहिती.
इंधनाचे साठे मर्यादित आहेत व इंधनाची बचत व्हावी म्हणून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत घटकांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस एकत्र उभारण्याच्या आव्हान केले आहे. सदर अनुदान कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारणीस मदत व्हावी म्हणून हे अनुदान दिले गेले आहे…….
बायोग्या संयंत्राला संलग्न शौचालयाची उभारणी करण्यास शासनाने १६०० अनुदान दिले आहे.
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
तर केंद्र सरकार 13000 रुपयांचे अनुदान थेट सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
हा सर्व क्रम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबवला जाणार आहे……
सेंद्रिय शेतीचे उपयोग कोणते ?
सेंद्रिय शेतीमुळे शेतीची गुणवत्ता वाढते.
जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ ही चांगली होते. पिकाच्या आरोग्यास पोषक आणि उच्च प्रतीचे उत्पादन घेण्यास ताकद व मदत मिळते…..
सेंद्रिय आणि रासायनिक शेती पद्धती –
हरितक्रांतीमध्ये रासायनिक खतांचा उगम झाला व शेतकरी भारतात ते खूप मोठ्या प्रमाणात वापरू लागले. सुरुवातीच्या काळात रासायनिक खतामुळे शेतीचे उत्पादन प्रचंड प्रमाणात मिळू लागले व त्यामुळे नंतर जमीन कठीण होऊ लागली. आधीच्या काळात लोक शेतीची मशागत हे लाकडी नांगराने करत असत पण नंतर तेही बदलून ते लोखंडी नांगरणी करू लागले त्यामुळे जमीन जास्तच कठीण होऊ लागली. रासायनिक खतांमुळे व औषधांमुळे जमीन कठीण होऊन मृत होत चालली आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती हरितक्रांतीपर्यंत केली गेली त्यानंतर रासायनिक खतांचा जोर वाढला…….
हल्लीच्या काळात शेतकरी जास्त उत्पन्न मिळावे या उद्देशाने रासायनिक खतांचा अतिवापर करतो पण त्यानंतर त्याचे वाईट परिणाम ही भोगावे लागतात कारण कॅन्सर सारखे घातक आजार ही यामुळे उद्भवतात व साऱ्या देशाला त्याला सामोरे जावे लागत आहे. संशोधक शास्त्रज्ञ डॉक्टर रश्मी संघि आयआयटी कानपूर यांचा असं म्हणणं आहे की रासायनिक खते वापरून केल्या गेलेल्या शेतीतून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधांचा अंश आढळतो व त्यामुळे पुढील पिढीस ही ते हानिकारक होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय शेती भर देण्यात यावा…….
A. पर्यावरणीय तत्त्व :–
सेंद्रिय शेती ही पर्यावरण व निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून असणाऱ्या असावी. जीवसृष्टीला धरून चालणारी व त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका झाला नाही पाहिजे. त्यामुळे प्रदूषण ही झालं नाही पाहिजे…….
B.आरोग्यायचे तत्त्व :–
सेंद्रिय शेती ही पशुपक्षी ,माती, हवा, पाणी, धान्याची रोपे, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य सुदृढ करणारी असावी. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली राहण्यास मदत होते…
C. संगोपनाचे तत्त्व :–
यामधून सर्व घटकांचे सुयोग्य असे संगोपन होण्याची मदत होते जेणेकरून सध्याच्या आणि पुढच्या पिढीला आरोग्याच्या दृष्टीने चांगली मदत होईल……..
सेंद्रिय खताचे प्रकार कोणते ?
प्राणी वनस्पती अशा प्रकारचे नैसर्गिक घटकापासून आपण जे खत तयार करतो त्या सेंद्रिय खत असे म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे शेणखत तेलबियानांची पेंट हिरवळीचे खत माशांचे खत खाटीक खाण्याचे खत हाडांचे खत गांडूळ खते कंपोस्ट इत्यादी पासून सेंद्रिय खते तयार होतात. या खतामध्ये कोण कोणते खते कोणकोणत्या शेतीसपुरक आणि आवश्यक आहेत हेही आपण पाहणार आहोत……..
A. गांडूळ खत –
गांडूळ खतामध्ये गांडूळांची अंडीपुंज गांडूळाची विष्ठा आणि नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ आणि जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा समावेश करून ते पूर्णपणे कुजवून करण्यात आलेल्या खताला गांडूळ खताचे म्हणतात….
B. शेणखत –
शेणखतामध्ये नत्र स्फुरद व पालाश असते गोठ्यातील पालापाचोळा गाई म्हशींचे शेण मूत्र इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खतास शेणखत असे म्हणतात. शेणाचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅसमध्येही केला जातो आणि त्याचा वापर गांडूळ खताच्या बेडमध्ये सुद्धा केला जातो. त्यामधून गुरुवारी शिल्लक राहिलेले क्षण पिकांच्या वाढीसाठी पोषक घटक म्हणून ही वापरले जाते……
C. हिरवळीची खते –
हे खत प्रामुख्याने मातीला नत्र हा घटक पुरवते व त्यामुळे जमीन ही सुपीक बनते. हिरवळीची खते तयार करण्यासाठी आपल्याला हिरवळीच्या खतांच्या पिकांची वाढ करून त्याचे दाट पेरणी करून ते नांगरणीच्या साह्याने मातीमध्ये गाढावे लागते. अशा प्रकारच्या खतांना हिरवळीचे खत असे म्हणतात. मुगाचा पालापाचोळा ताग अश्या हिरवळीच्या खर्चामुळे गावाच्या उत्पादनास भरघोस मदत होते. गाडलेल्या पिकांना कुजवून खत करण्यासाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो. शेवरी गवार यांच्या मग चवळी ताग बरसिम पोलीस रेड्या ताकापासून नत्राचा पुरवठा हा चांगल्या प्रमाणे होतो. तो पाच ते सहा आठवड्यातच होतो……..
D. माशाचे खत –
समुद्रकिनारी वाया गेलेल्या अनेक खराब माशापासून त्या माशांचे तेल काढल्यानंतर उरलेल्या माशांचे अनावश्यक अवशेष पासून जे खत तयार होते त्या खतास माशांचे खत असे म्हणले जातात. या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या जमिनीला आवश्यक असणारे घटकांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे जमिनीला या खतांचा उपयोग करून जमिनीचे सुपीकता वाढते आणि जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात ही भर पडते…….
E. कंपोस्ट खत –
कंपोस्ट खतामध्येही नत्र , स्फुरद आणि पालाश असते कंपोस्ट खत हे पिकांच्या कापणीनंतर उरलेले अवशेष, त्यांचे देठ , शेतातील गवत, कापसाचे घसकट भुसा व उसाची पाचट इत्यादी पदार्थांपासून कंपोस्ट खत हे तयार केले जातात. कंपोस्ट खतामध्ये सेंद्रिय पद्धतीने सूक्ष्मजीवांमुळे त्यांचे विघटन होऊन ते कुजलेल्या अवस्थेत शेतामध्ये वापरले जाते त्यामुळे मातीचा पोत ही सुधारतो………
F. गोमूत्र –
गोमूत्र चा उपयोग १:२० प्रमाणात केल्याने कीड नियंत्रण चांगली होते. पिकाची वाढ ही चांगल्या रीतीने होते. रोग निर्माण करणारे जिवाणू पण वाढीस लागू शकतात अशावेळी ट्रायको धर्मा नावाचे जिवाणू मातीत सोडल्याने रोग नियंत्रण चांगले होते व ते ऑफिस सारख्या कीटकास नियंत्रण करण्यासाठी एक चांगला जैविक उपाय आहे.
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कर्मचारी ( वर्ग – 4 ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 190+ जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 212 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- आर्मी पब्लिक स्कुल देवळाली , नाशिक अंतर्गत सन 2025-26 करीता शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !