सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 192 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Bank Of India Recruitment For Specialist Officers Post , Number of Post Vacancy -192 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अधिकारी पदांच्या तब्बल 192 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे पुर्ण वेळ मास्टर्स अथवा अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी किंवा बी.एस्सी / एमबीए / एमसीए / ICWA /ICAI /MMS / MSC तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : सचिवालय मध्ये मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
परीक्षा शुल्क : सदर पदभरती प्रक्रिया करीता 850/- रुपये + GST अशी रक्कम आकारली जाणार आहे , तर मागास प्रवर्ग व अपंग उमेदवारांना 175 रुपये + GST रक्कम अदा करण्यात येईल .
वेतनमान : 36,000/- ते 1,00,350/- रुपये
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cbiosep23/ या संकेतस्थळावर दिनांक 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..