कॅबिनेट सचिवालय मध्ये तब्बल 125 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cabinet Secretariat Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 125 ) पदनाम , पदांची संख्या या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये उपक्षेत्र अधिकारी ( Deputy Field Officers ) पदांच्या 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा संस्था मधून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मधील बॅचलर पदवी किंवा विज्ञान अथवा इतर कोणत्याही तांत्रिक किंवा वैज्ञानिक विषयांमधील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच GATE अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : आवेदन सादर करतेवेळी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
प्रतिमहा वेतनमान : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 90,000/- रुपये वेतनमान अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Post Bag No.001 Lodhi Road Head Post Office , New Delhi – 110003 या पत्यावर दिनांक 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत पत्राद्वारे पोस्टाने सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .