महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत स्थापत्य आणि विद्युत सेवा मध्ये तब्बल 510 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Service Commission Recruitment For Engineering Services , Number of Post Vacnacy – 510 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
01.महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा : महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये 495 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.महाराष्ट्र विद्युत सेवा : महाराष्ट्र विद्युत सेवा मध्ये 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : गोवा येथे नोकरीची मोठी सुवर्णसंधी, लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.06.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 07.11.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 544/- तर राखीव प्रवर्ग करीता 344/- रुपये परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026