SIDBI : भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्ये पदवी धारकांसाठी नोकरीची मोठी सुवर्ण संधी ! लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्ये पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकउून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Small Industries Development Bank Of India Recruitment For Assistant Manager Post , Number Of Post Vacancy – 50 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहायक व्यवस्थापक पदांच्या 50 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , संवर्ग निहाय पदांचे विवरण पुढीलप्रमाणे आहेत .

अ.क्रसंवर्गपदसंख्या
01.SC08
02.ST04
03.OBC11
04.EWS05
05.UR22
 एकुण पदांची संख्या50

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी अथवा विधी शाखेतुन ( LLB ) पदवी उत्तीर्ण / इंजिनिअरिंग पदवी /CA /CS /CWA /CFA अर्हता 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर मागास प्रवर्ग करीता 5 टक्क्यांची सुट देण्यात येणार आहेत . तसेच 02 ते 03 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहेत .

हे पण वाचा : राज्य शासन सेवेत गट ब आणि गट ड संवर्गात विविध पदांच्या 4000+ जागांसाठी महाभरती , लगचे करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 08 नोव्हेंबर 2023 रोजी कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sidbi.in/en/career या संकेतस्थळावर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 1100/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 175/- परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment