राज्य शासन सेवेत गट ब आणि गट ड संवर्गात विविध पदांच्या 4000+ जागांसाठी महाभरती , लगचे करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत विविध गट ब आणि गड ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 4000+ जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Of Maharashtra , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 4497 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या 04 जागा , निम्नश्रेणी लघुलेखक पदांच्या 19 जागा , कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या 14 जागा , वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या 05 जागा , आरेखक पदांच्या 25 जागा , सहाय्यक आरेखक पदांच्या 60 जागा , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या 1528 जागा ,प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 35 जागा , अनुरेखक पदांच्या 284 जागा ..

दफ्तर कारकुन पदांच्या 430 जागा , मोजणीदार पदांच्या 758 जागा , कालवा निरीक्षक पदांच्या 1189 जागा , सहाय्यक भांडारपाल पदांच्या 138 जागा , कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक पदांच्या 08 जागा अशा एकुण 4497 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : MPSC : मार्फत गट अ , ब ( राजपत्रित / अराजपत्रित ) पदांच्या 303 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी , कोणत्याही शाखेतील पदवी , टंकलेखन अर्हता , 12 वी / 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे या वेबसाईटवर दिनांक 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरतीसाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1000/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900/- परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment