भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्ये पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकउून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Small Industries Development Bank Of India Recruitment For Assistant Manager Post , Number Of Post Vacancy – 50 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहायक व्यवस्थापक पदांच्या 50 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , संवर्ग निहाय पदांचे विवरण पुढीलप्रमाणे आहेत .
| अ.क्र | संवर्ग | पदसंख्या |
| 01. | SC | 08 |
| 02. | ST | 04 |
| 03. | OBC | 11 |
| 04. | EWS | 05 |
| 05. | UR | 22 |
| एकुण पदांची संख्या | 50 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी अथवा विधी शाखेतुन ( LLB ) पदवी उत्तीर्ण / इंजिनिअरिंग पदवी /CA /CS /CWA /CFA अर्हता 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर मागास प्रवर्ग करीता 5 टक्क्यांची सुट देण्यात येणार आहेत . तसेच 02 ते 03 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 08 नोव्हेंबर 2023 रोजी कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sidbi.in/en/career या संकेतस्थळावर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 1100/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 175/- परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..