भारतीय स्टेट बँक मध्ये तब्बल 8,283 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank Of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 8,283 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये लिपिक ( ज्युनियर असोसिएट / कस्टमर सपोर्ट आणि सेल्स ) पदांच्या 8,283 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( यापैकी अनुसुचित जमाती प्रवर्ग करीता 1284 जागा , अनुसुचित जाती प्रवर्ग करीता 748 जागा , इतर मागास प्रवर्ग करीता 1919 जागा , आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 817 जागा तर खुला प्रवर्ग करीता 3,515 जागा अशा एकुण 8,283 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .)
आवश्यक अर्हता : सदर पदाकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/ या संकेतस्थळावर दिनांक 17 नोव्हेंबर 2023 पासुन ते 07 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता खुला / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 750/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / अपंग उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !