महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये तब्बल 1,729 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Health Department Recruitment For Medical Officers Group – A Post , Number of Post Vacancy – 1729 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये वैद्यकिय अधिकारी गट अ पदांच्या 1729 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Medical Officers Group – A Post , Number of Post Vacancy – 1729 )
हे पण वाचा : मुंबई , नागपूर, शिर्डी, अमरावती येथे नोकरीची सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये वैद्यकिय अधिकारी पदांसाठी उमेदवार हे MBBS / समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर वैद्यकीय अधिकारी ( विशेषज्ञ ) पदांसाठी उमेदवार हे वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 18/19 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग / अनाथ / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.morecruitment.maha-arogya.com/ या संकेतस्थळावर दिनांक 15.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 700/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026