कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन मध्ये तब्बल 142 जागेसाठी मेाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kalyan – Dombivli Municipal Corporation Recruitment For Medical Officer & Multipurpose Worker Post , Number of Post Vacancy – 142 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.वैद्यकीय अधिकारी : वैद्यकीय अधिकारी पदांच्या 67 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS /BAMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही 70 वर्षापर्यंत ( MBBS करीता ) तर BAMS करीता कमाल वयोमर्यादा ही 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहे .
02.बहुउद्देशिय कर्मचारी : बहुउद्देशिय कर्मचारी पदांच्या 75 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी ( विज्ञान ) उत्तीर्ण तसेच पॅरोमेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स अथवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र शासनांच्या MRSAC अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
आवेदन स्विकारण्याचे ठिकाण : सदर वरील पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे आचार्य अंत्रे रंगमंदीर कॉन्फरन्स हॉल पहीला मजला कै. शंकराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ शंकरराव चौक कल्याण ( पश्चिम ) ता. कल्याण जि. ठाणे या ठिकाण समक्ष सादर करायचे आहेत .
आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक : यांमध्ये पद क्रमांक 01 करीता आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक 12.02.2024 तर पद क्र.02 करीता आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक ही 14.02.2024 अशी असणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !