AIESL : भारतीय हवाई सेवा मुंबई येथे मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Air India Engineering Services Limited Recruitment For Aircraft Technician Post , Number of Post Vacacny – 140 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

एअरक्राफ्ट टेक्निशियन ( A & C )  : एयरक्राफ्ट टेक्निशियन ( A & C )  पदांच्या एकुण 100 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा 60 टक्के गुणांसह मेकॅनिकल किंवा मेकॅनिकल अथवा एरोनॉटिकल इंजिनिअरींग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आवश्यक आहे . मागासवगीर्य / इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 55 टक्के गुणांसह अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

एअरक्राफ्ट टेक्निशियन ( एव्हिओनिक्स ) : एअरक्राफ्ट टेक्निशियन ( एव्हिओनिक्स ) पदांच्या एकुण 40 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 60 टक्के गुणांसह एव्हिओनिक्स / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रानिक्स / टेलिकम्युनिकेशन / रेडिओ / इन्स्ट़ुमेंटेशन इंजिनिअरींग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . यांमध्ये मागास वर्गीय / इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 55 टक्के गुणांसह अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा : वरील दोन्ही पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01 मे 2023 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे . यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : पंजाब नॅशनल बँकेत मोठी पदभरती प्रक्रिया !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://docs.google.com/forms या संकेतस्थळावर दिनांक 29 मे 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये आवेदन शुल्क आकारण्‍यात येईल , तर मागास वर्गीय / माजी सैनिक उमेदवारांकरीता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment