ZP Pune : जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 171 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

दंत चिकित्सक : दंतचिकित्सक पदांच्या एकूण 05 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा एमडीएस / बीडीएस पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदाकरिता उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षे तर , राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्षे असणे आवश्यक आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 30,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .

जिल्हा सनियंत्रक व मूल्यमापन अधिकारी : जिल्हा सनियंत्रक व मूल्यमापन अधिकारी पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा M.SC स्टॅटिस्टिक्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे कमाल होईल 38 वर्ष तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्ष असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता 30,000/- प्रतिमहा वेतन देण्यात येईल .

वित्त व लेखाधिकारी : वित्त व लेखाधिकारी पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा एम कॉम / बी कॉम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवारांचे कमाल वय 38 वर्ष तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराकरिता 43 वर्ष असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमा हा 20,000/- रुपये वेतन देण्यात येईल .

कार्यक्रम समन्वयक : कार्यक्रम समन्वयक पदांच्या 01 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा एम एस डब्ल्यू किंवा एम ए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदाकरिता उमेदवाराचे कमाल वय 38 वर्ष व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्ष असणे आवश्यक आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 20,000/- वेतनमान देण्यात येईल .

लसीकरण क्षेत्र सनियंत्रक : लसीकरण क्षेत्र सनियंत्रक पदांच्या एकूण 04 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे . सदर पदाकरिता उमेदवाराची कमाल वय 38 वर्ष तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्ष असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता 15000 रुपये अधिक पाच हजार रुपये असे एकूण 20 हजार रुपये प्रतिमहा वेतन देण्यात येईल .

स्टाफ नर्स / एल एच व्ही / पेडियाट्रिक नर्स : स्टाफ नर्स / एल एच व्ही / पेडियाट्रिक नर्स पदांच्या एकूण 134 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार जी एन एम / बी एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्ष असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमा हा 20 हजार रुपये वेतन देण्यात येईल .

सांख्यिकी अन्वेषक : सांख्यिकी अन्वेषक पदांच्या एकूण 01 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार स्टॅटिस्टिक्स / गणित विषयासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदाकरिता उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्ष असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 18,000/- हजार रुपये वेतनमान देण्यात येईल .

हे पण वाचा : पुणे येथे पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

ANM : ANM पदांच्या एकूण 22 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार ANM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर सदर पदाकरिता उमेदवाराचे कमाल होईल 38 वर्ष तर राखीव प्रवरातील उमेदवारांकरिता 43 वर्ष असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 18000/- रुपये वेतन देण्यात येईल .

फॅसिलिटी मॅनेजर : फॅसिलिटी मॅनेजर पदांच्या एकूण 01 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता बी इलेक्ट्रॉनिक्स / टेली कम्युनिकेशन / आयटी कम्प्युटर सायन्स किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारकरिता 43 वर्ष असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 17,000/- हजार रुपये वेतन देण्यात येईल .

डायलेसिस टेक्निशियन : डायलेसिस टेक्निशियन पदांच्या एकूण 01 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उमेदवार हा बारावी विज्ञान सह डायलिसिस तंत्रज्ञ डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमा 17,000/- हजार रुपये वेतनमान देण्यात येईल .

हे पण वाचा : सिन्नर ,नारायणगाव ,चाकण ,शेवगाव ,कर्जत येथे मोठी पदभरती प्रक्रिया !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने चौथा मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन जिल्हा परिषद पुणे या पत्त्यावर दिनांक 6 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पदाकरिता 150/- रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 100/- आवेदन शुल्क ( Application Fees ) आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment