AIASL : एअर इंडिया सेवा मध्ये पदवी / 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी 145 जागेसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

एअर इंडिया सेवा मध्ये पदवी / 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्र्रिया राबविण्यात येत आहेत . ( Air India Air Service Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 145 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अधिकारी ( तांत्रिक )02
02.ग्राहक सेवा एक्झिक्युटिव21
03.कनिष्ठ ग्राहक सेवा एक्झिक्युटीव21
04.रॅम्प सेवा एक्झिक्युटीव18
05.युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक17
06.हँडीमन66
 एकुण पदांची संख्या145

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : संबंधित विषयांमधील इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई येथे डॉक्टर , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , नर्स , तंत्रज्ञ पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमदेवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयातील इंजिनिअरिंग / आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी कमाल वयोमर्यादा हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

पदांनुसार थेट मुलाखतीचा दिनांक :

अ.क्रपदनामथेट मुलाखत दिनांक
01.कनिष्ठ अधिकारी ( तांत्रिक )08 मे 2024
02.ग्राहक सेवा एक्झिक्युटिव09 मे 2024
03.कनिष्ठ ग्राहक सेवा एक्झिक्युटीव09 मे 2024
04.रॅम्प सेवा एक्झिक्युटीव10 मे 2024
05.युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक10 मे 2024
06.हँडीमन11 मे 2024

थेट मुलाखतीचे ठिकाण : Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur: 302029 या ठिकाणी वरील दिनांकानुसार सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरा पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment