Air India : भारतीय हवाई सेवा मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

Spread the love

भारतीय विमान हवाई वाहतुक सेवा मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Air India Air Services Limited Recruitment for Various Post , Number of Post vacancy -495 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

यामध्ये ग्राहक सेवा कार्यकारी पदांच्या एकुण 80 जागांसाठी तर कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( ज्युनिअर कस्टमर सर्विस एक्झिक्युटीव ) पदांच्या एकुण 64 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तसेच रॅम्प सेवा / युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक पदांच्या एकुण 121 जागांसाठी तर हँडीमन पदांच्या एकुण 230 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

यामध्ये ग्राहक सेवा कार्यकारी पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक आहे . तर कनिष्ठ ग्राहक कार्यकारी पदांसाठी उमदेवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर रॅम्प सेवा / युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक पदांसाठी उमदेवार हा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर हँडिमन पदांसाठी उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 एप्रिल 2023 रोजी कमाल वयोमर्याया 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे , तर मागास वर्गीय ( SC /ST ) उमेदवारांना वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास वर्गीय ( OBC ) उमेदवारांना वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment