पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदावर अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 28 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती , परंतु आता सदर पदभरती प्रक्रिया करिता दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेले आहे .यामुळे ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला नाही ,अशांना अर्ज सादर करण्याची पुन्हा एकदा सुवर्णसंधी मिळालेली आहे .
यामध्ये संवर्ग ” अ ” मध्ये क्ष किरण तज्ञ पदांच्या एकूण 08 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . तर संवर्ग दोन मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदांच्या 20 जागा , उपसंचालक उप उद्यान अधीक्षक या पदांच्या 02 जागा ,तर पशुवैद्यकीय अधिकारी या पदाकरिता 02 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
तर संवर्ग ” क ” मध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदांच्या 20 जागेसाठी तर आरोग्य निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदांकरिता 40 जागेसाठी , कनिष्ठ अभियंता या पदांच्या 10 जागा , वाहन निरीक्षक पदांच्या 03 जागेसाठी , औषध निर्माता पदांच्या 15 जागेसाठी , पशुधन पर्यवेक्षक पदांच्या 01 जागेसाठी तर अग्निशामक विमोचन पदांच्या 200 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
अर्ज प्रक्रिया / फीस : जाहिराती मध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत https://ibpsonline.ibps.in/pmc या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . यामध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये परीक्षा शुल्क , तर मागासवर्गीय उमेदवारांना 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !