मेगाभर्ती : भारतीय विमान सेवा मध्ये पदवी /12 वी /10 वी पात्रता धारकांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

Spread the love

भारतीय विमान वाहतुक सेवा मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे .यासाठी पात्र उमेदवारांनी जाहीरातीमध्ये नमुद विहीत वेळेत सर्व कागतपत्रांसह दिलेल्या ठिकाण मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे . सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

1. ग्राहक सेवा एक्झिक्युटिव पदांच्या एकुण 80 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी धारण करणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01.04.2023 पर्यंत 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .

2. कनिष्‍ठ ग्राहक एक्झिक्युटीव पदांच्या एकुण 64 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01.04.2023 पर्यंत 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .

3.रॅम्प सेवा एक्झिक्युटिव / युटिलिटी एजंट कम रॅम्प पदांच्या एकुण 121 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इंजिनिअरिंग डिप्लोमा / आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01.04.2023 पर्यंत 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .

4. हँडिमन पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01.04.2023 पर्यंत 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, चैन्नई या पत्त्यावर दि.17 ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये सकाळी 9.00 AM ते 12.00 PM या वेळेत मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे .सदर पदांकरीता खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून 500/-रुपये तर मागास वर्गीय / महीला उमदेवारांकडुन फीस आकारली जाणार नाही .

या संदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया जाहीरात (Advertise ) व आवेदन अर्ज ( Application Form ) डाऊनलोड करण्यासाठी खालील नमूद लिंकवर क्लिक करावे !

जाहिरात / अर्ज

Leave a Comment