राज्यात अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या तब्बल 20 हजार रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . यांमध्ये काही जिल्ह्याच्या जाहीरात प्रसिद्ध होणे बाकी आहेत .यांमध्ये अंगणवाडी सेविका / मदतनिस पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक अर्हता नुसार गुणदान पद्धती बाबत राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
किमान अर्हता : उमेदवार हे किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असतील , यांमध्ये 80 टक्के पेक्षा अधिक गुण असणाऱ्यांना 60 गुण देण्यात येतील , तर बारावीमध्ये 70.01 टक्के ते 80 टक्के पर्यंत गुण असणाऱ्यांना 55 गुण देण्यात येतील , तर 50.01 ते 60 टक्के असणाऱ्या उमेदवारांना 45 गुण देण्यात येतील .तर 50 टक्के ते 40 टक्के गुण असणाऱ्या उमेदवारांना 40 गुण देण्यात येतील .
इतर अर्हता : कोणतीही पदवी धारकांना 10 गुण तर पदव्युत्तर पदवी धारकांसाठी 04 गुण तर डी.एड धारकांना 02 गुण , बी.एड धारकास 02 गुण देण्यात येतील .तर MSCIT उत्तीर्ण उमेदवारांस अतिरिक्त 02 गुण देण्यात येतील .
हे पण वाचा : अमरावती येथे भव्य रोजगार मेळावा 2025 : विविध पदांच्या 360 जागेसाठी पदभरती !
इतर गुण : इतर गुणांमध्ये विधवा /अनाथ असणाऱ्या उमेदवारांस 10 गुण तर अनुसुचित जाती / जमाती प्रवर्गास 05 गुण तर इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग करीता 03 गुण तर अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 02 वर्षाचा अनुभव असल्यास 05 गुण देण्यात येईल .

- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !