राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बुलडाणा येथे आशा स्वयंसेविका पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पद भरती प्रक्रिया केवळ महिला उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत .शिवाय स्थानिक व उच्च शिक्षित उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल .यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये अर्ज स्विकारण्यात येणार आहेत . पदभरती बाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .
बुलडाणा जिल्ह्यातील चैतन्यवाडी ,लांडे ले – आऊट , विष्णूवाडी ,इंदिरा नगर , संगम तलाव , सावित्रीबाई फुले , सरस्वती नगर , जुना आरटीओ परिसर , मुठ्ठे – मच्छे ले आऊट ,भिमनगर , एकता व केशव नगर , रामदेवबाबा मठ , जोहरनगर , गवळीपुरा , क्रिडासंकुल , वावरे ले – आऊट ,कैकाडीपुरा ,भिलवाडा व मिलिट्री प्लॉट , राम नगर , मिर्झानगर , सुवर्ण नगर ,या कार्यक्षेत्रामध्ये आशा स्वयंसेविकांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .आशा स्वयंसेविका पदांच्या एकुण 19 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता / वयोमर्यादा
सदर पदांकरीता केवळ महिला उमेदवारांना अर्ज सादर करता येईल .यासाठी अर्ज सादर करणाऱ्या उमदेवारांचे किमान शैक्षणिक पात्रता 10 वी पास असणे आवश्यक आहे .परंतु उच्च शिक्षित उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे .त्याचबरोबर या पदांसाठी उमेदवारांचे किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 45 वर्षे असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया
वरील नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्जासोबत 25 रुपयाचे टिकिट लावलेला लिफाफासह सर्व दस्ताऐवजांच्या सांक्षाकित प्रतिसह आपला अर्ज दि.29.10.2022 पर्यंत वैद्यकिय अधिकारी , नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जोहर नगर उर्दु शाळेसमोर बुलडाणा येथे अर्ज सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात डाऊनलोड करा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !