बँकेत लिपिक , शिपाई , वाहन चालक , सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये लिपिक , शिपाई , वाहन चालक , सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Solapur Zilha Nagari Sahakari Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -Not Declead ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.लिपिक
02.शिपाई
03.वाहनचालक
04.सुरक्षा रक्षक

01.लिपिक ( Clerk ) : लिपीक पदांसाठी उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच एम एस सीआयटी किंवा समतुल्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 34 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : तलाठी पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हानिहाय जाहीर !

02.शिपाई ( Peon ) : शिपाई पदांकरीता उमेदवार हे किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे किमान वय हे 25 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

03.वाहन चालक ( Driver ) : सदर पदांकरीता उमेदवार हे किमान 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच चारचाकी वाहन चालविण्याचा परवारना असणे आवश्यक असणार आहेत . तर उमेदवाराचे किमान वय हे 25 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

04.सुरक्षा रक्षक ( Security Guard ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्‍क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे http://surbanksassociation.com/index.php या संकेतस्थळावर दिनांक 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment