राज्य शासनाने निर्गमित केलेल्या निर्णयान्वये राज्यातील महानगरपालिकांमध्ये 22,831 जागेसाठी पदभरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे . कोरोना महामारीच्या काळांमध्ये मुंबई महानगरपालिकेतील तब्बल 10 हजार जागांसाठी पदभरतीसाठी राज्य शासनाकडून सहमती मिळालेली आहे .यापैकी काही पदांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे .
यामध्ये मुंबई पालिका अंतर्गत अग्निशमन विभागाकडून अग्निशमन जवान पदांच्या 910 जागांसाठी पदभरती सुरु करण्यात आलेली आहे .तसेच उर्वरित 9 हजार पदांमध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या सर्वात जास्त 1100 पदे रिक्त आहेत .यामुळे पालिका प्रशासनामध्ये कनिष्ठ लिपिक पदांचे पदे प्रथम प्राध्यान्याने भरण्यात येणार आहेत . त्याचबरोबर पालिका प्रशासनातील शिक्षक , सुरक्षा रक्षक , अभियंता , शिपाई तसेच सफाई कामगार अशा पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
सदर महाभरती प्रक्रिया राबविण्याकरीता पालिका प्रशासनांकडून परिपत्रक काढून मंदावलेली पदभरती प्रक्रिया सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे .याकरीता शासनाच्या अध्यादेशानुसार भरती करीता कंपनी एजन्सीसोबत करार , अटी / शर्ती यासारख्या बाबी पुर्ण करण्याचे कामकाज पालिका प्रशासनांकडून करण्यात येत आहेत .
सदर पदभरती प्रक्रिया बाबतची अधकिृत्त जाहीरात ही 15 मार्च पर्यात निर्गमित करण्यात येईल , व ऑनलाईन परिक्षेचे आयोजन मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे .उमेदवारांनी भरती प्रक्रिये करीता आवश्यक कागतपत्रे , इतर आवश्यक बाबींची पुर्तता करुन घेणे आवश्यक आहे .
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .