केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये सहाय्यक कमांडंट पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Armed Police Forces Recruitment For Assistant Commandants Post , Number of Post Vacancy – 506 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सहाय्यक कमांडंट ( Assistant Commandant ) पदांच्या एकुण 506 जागेसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . फोर्सनुसार पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| अ.क्र | फोर्सचे नाव | पदसंख्या |
| 01. | SSB | 42 |
| 02. | ITBP | 58 |
| 03. | CISF | 100 |
| 04. | CRPF | 120 |
| 05. | BSF | 186 |
| एकुण पदांची संख्या | 506 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
आवश्यक शारीरिक पात्रता :
| पुरुष / महिला | पुरुष | महिला |
| उंची | 165 से.मी | 157 से.मी |
| छाती | 81-86 से.मी | – |
| वजन | 50 KG | 46 KG |
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 14.05.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / इतर मागास प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास प्रवर्ग / महीला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !