भारतीय रेल्वे मध्ये TTE (प्रवासी तिकीट परीक्षक) पदांच्या तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती लवकरच ; पदभरती नोटीफिकेशन जारी !

Spread the love

भारतीय रेल्वे विभाग मध्ये प्रवासी तिकीट परीक्षक ( TTE ) पदाच्या तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून आवेदन मागविण्यात येणार आहेत . या संदर्भात रेल्वे विभागांकडून पदभरती बाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेला आहे .( Indian Railway Recruitment For TTE Post Number of Post Vacancy – 8000+ ) सविस्तर पदभरती नोटीफिकेशन पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पदाचे नावे / रिक्त जागा संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्रवासी तिकीट परीक्षक ( TTE ) पदांच्या एकुण 8000+ जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता नियमांनुसार सवलत देण्यात येईल .

हे पण वाचा : केन्द्र शासन सेवेत गट ब व क संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती, लगेच करा आवेदन !

वेतनमान ( Pay Scale ) : 27400-45600/- या वेतनश्रेणी ( सातव्या वेतन आयोगानुसार )

निवड प्रक्रिया : सदर पदांकरीता प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल , त्यानंतर शारीरिक चाचणी व त्यानंतर वैद्यकीय चाचणी अंती उमेदवारांची गुणानुक्रमे व आरक्षणनिहाय निवड करण्यात येईल .

सदर पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने लवकरच आवेदन मागविण्यात येणार आहेत , या बाबत रेल्वे संकेतस्थळावर अपडेट दिली जाईल , अशी माहिती रेल्वे विभागांकडून जाहीर करण्यात आलेली आहे .

Leave a Comment