केंद्र शासन सेवेमध्ये संवर्ग क मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत . सदर महाभरती प्रक्रिया संदर्भात केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडून पदभरती प्रक्रिया अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे देशातील तब्बल 1 लाख 30 हजार बेरोजगार तरुणांना हक्काची नोकरी मिळणार आहे .
यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस बल , पोलिस शिपाई साधारण ड्यूटी , साधारण ड्युटी त्याचबरोबर समुह क पदांकरीता देखिल पदभरती करण्यात येणार आहेत . सदरची पदे हे संवर्ग क मध्ये मोडत असून नॉन गॅझेटेड पदे आहेत .यामध्ये एकुण 129,929 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , यामध्ये पुरष उमेदवारांची एकुण 125,262 पदांवर तर महिला उमेदवारांकरीता 4,667 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
सविस्तर मेगाभर्ती जाहीरात पाहा
पात्रता – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त माध्यमिक मंडळामधून माध्यमिक बोर्ड परीक्षा ( SSC ) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमदेवार हा शारिरीक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे .शारीरिक पात्रतेच्या दृष्टीने भरती प्रक्रिया अधिसुचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे पात्र असणे आवश्यक आहे .
वेतनमान – निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार , रुपये 21,700-69100/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन देण्यात येतील , तसेच इतर लागु असणारे वेतन + भत्ते अनुज्ञेय राहतील .
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !