राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचं नावे , पदांची संख्या , पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये संवर्ग अ व ब पदांकरीता पदभरती प्रक्रिय राबविण्यात येत आहेत .यामध्ये विधी सल्लागार पदांच्या एकुण 01 जागेसाठी तर विधी अधिकारी गट अ पदांच्या 20 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तसेच विधी अधिकारी गट ब संवर्गाच्या एकुण 16 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
वरील पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे , तसेच तो सनदधारक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवार हा विधी सल्लागार या पदाकरीता वकिली व्यवसायाचा अनुभव असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे वय दि.27.04.2023 रोजी विधी सल्लागार पदांकरीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षे तर विधी अधिकारी गट अ करीता 40 वर्षे तर विध अधिकारी गट ब पदांकरीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 35 वर्ष असणे आवश्यक आहे .
निवड झालेल्या उमेदवारांस 20,000/- ते 28,000/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन देण्यात येतील .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई दुसरा मजला जुने जकातघर शहीद भगतसिंग मार्ग मुंबई या पत्त्यावर दि.27.04.2023 पर्यंत सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026