गृह विभागांमध्ये बहुउद्दशिय कर्मचारी ( MTS ) व हवालदार पदांच्या 1,558 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

गृह विभाग अंतर्गत बहुउद्देशिय कर्मचारी ( MTS )  व हवालदार पदांच्या एकुण 1,558 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , आवश्यक पात्रता , अर्हता इ. पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

बहुउद्देशिय कर्मचारी / MTS :  यांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ  ( नॉन टेक्निकल ) स्टाफ ( MTS ) पदांच्या एकुण 1198 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच सदर उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर यांमध्ये SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

हवालदार : हवालदार पदांच्या एकुण 360 जागांठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

शारीरिक पात्रता – पुरुष उमेदवारांकरीता उंची ही 157.5 से.मी असणे असणे आवश्यक असणार आहे तर मागास प्रवर्गाकरीता उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 से.मी ची सुट देण्यात येणार आहे तसेच उमेदवाराची छाती ही 81 से.मी असणे आवश्यक असणार आहे तर 5 से.मी फुगवता येणे आवश्यक असणार आहे .

तर महिला उमेदवारांकरीता उंची ही 152 से.मी असणे आवश्यक असणार आहे तर मागास प्रवर्गाकरीता उमेदवारांकरीता 2.5 से.मी सुट देण्यात येणार आहे . तसेच महिला उमेदवारांकरीता कमीत कमी 48 कि.ग्रॅम वजन असणे आवश्यक असणार आहे . तर मागास प्रवर्गातील महीला उमेदवारांकरीता वजनांमध्ये 2 कि.ग्रॅमची सुट देण्यात येणार आहे .

अधिक माहीतीसाठी / अर्ज सादर करण्यासाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment