वाहन चालक , माळी, सफाईगार, शिपाई , MTS अशा वर्ग – 4 पदांसाठी महाभरती ! लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय तटरक्षक दलामध्ये वाहनचालक ,माळी ,सफाईगार ,शिपाई ,मल्टी टास्किंग स्टाफ अशा संवर्ग – 4 मधील पदांकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नाव , पदसंख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरतीची माहिती पुढील प्रमाणे पाहूयात …

वाहनचालक : वाहन चालक पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 तर कमाल होईल 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

फिटर : फिटर या पदांच्या एकूण 02 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : नाशिक , नागपुर , नवी मंबई , परभणी महानगरपालिकांमध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

मल्टी टास्किंग स्टाफ : मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 02 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी किंवा समक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच दोन वर्षांची मेकॅनिकल वर्कशॉप चे अनुभव असणे आवश्यक असणार आहे.

माळी : माळी पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : मुंबई ,पुणे , नागपुर येथे फक्त 12 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 1086 जागेवर महाभरती प्रक्रिया ! लगेच करा आवेदन !

शिपाई : शिपाई पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी किंवा समक्ष शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

सफाईगार : सफाईगार पदांच्या एकूण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया : जाहिराती मध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज The Director General, {For PD(Rectt)}Coast Guard Headquarters,Directorate of Recruitment,C-1, Phase II, Industrial Area, Sector-62,Noida,U.P. – 201309 या पत्त्यावर दि.14 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment