नाशिक , नागपुर , नवी मंबई , परभणी महानगरपालिकांमध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

नाशिक , नागपुर , नवी मुंबई तसेच परभरणी महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पालिकानिहाय पदनाम , पदसंख्या व आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

मालेगाव ( नाशिक ) महानगरपालिका : मालेगाव ( नाशिक ) महानगरपालिकांमध्ये वकील पदांच्या एकुण 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा विधी शाखेचा पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये विधी शाखेत पदव्युत्तर परीक्षा LLM पदवी धारक असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे .सदर पदांसाठी अर्ज सादर कराण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 35 तर कमाल वय 50 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

परभणी महानगरपालिका : परभणी महानगपालिका मध्ये वैद्य पदांच्या 03 जागा , प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ पदांच्या 03 जागा , बालरोगतज्ञ पदांच्या 03 जागा , नेत्ररोगतज्ञ पदांच्या 03 जागा , त्वचारोगतज्ञ पदांच्या 03 जागा , मानसोपचारतज्ञ पदांच्या 03 जागा , तर ENT विशेषज्ञ पदांच्या 03 जागा अशा एकुण 21 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा :वाहन चालक , माळी, सफाईगार, शिपाई , MTS अशा वर्ग – 4 पदांसाठी महाभरती ! लगेच करा आवेदन !

नवी मुंबई महानगरपालिका : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये सहाय्यक शिक्षक पदांच्या एकुण 183 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा एच.एस.सी – डी.एड + महा टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच पदवी अंतिम वर्षांमध्ये सबंधित विषयासह किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : मुंबई ,पुणे , नागपुर येथे फक्त 12 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 1086 जागेवर महाभरती प्रक्रिया ! लगेच करा आवेदन !

नागपुर महानगरपालिका : नागपुर महानगरपालिकामध्ये वैद्यकिय अधिकारी पदांच्या एकुण 22 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा एम.बी.बीएस व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी असणे आवश्यक असणार आहे .सदर पदांस प्रतिमहा 30,000/- एवढे वेतनमान देण्यात येईल .

पालिका निहाय सविस्तर पदभरती जाहीरात पाहा ..

1.नवी मुंबई 01.जाहिरात पाहा , 02.जाहिरात पाहा

2.नाशिक पालिका जाहिरात पाहा

3.परभणी पालिका जाहिरात पाहा

4.नागपूर पालिका जाहिरात पाहा

Leave a Comment