भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील संचालक उपवने व उद्याने , महाराष्ट्र राज्य , मुंबई कार्यालयातील गट – क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची स्थापना करणेाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन दि.18.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . भरती प्रक्रियेसंदर्भातील सार्वजनिक विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
वरील नमुद पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील संचालक , उपवने व उद्याने , महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाचा आकृतीबंध शासन निर्णय दिनांक 27.12.2021 व शुद्धीपत्रक दिनांक 15.02.2022 अन्वये मंजुर झालेला असल्यामुळे सदर कार्यालयातील गट – क संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याकरीता राज्यस्तरीय निवड समितीची रचना स्थापन करण्यात आली आहे .यामध्ये एक अध्यक्ष , दोन सदस्य व एक सदस्य सचिवांची निवड करण्यात आलेली आहे .निवड समितीची स्थापना करताना नमुद अटी व शर्तींची पुर्तता करण्यात आलेली आहे . यामुळे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे .
पदभरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने दि.04.05.2022 च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत .पदभरती करताना शासनाने विहीत केलेली कार्यपद्धती , सेवाप्रवेश नियम , सर्व प्रकारचे आरक्षण या संदर्भातील नियम व आदेश विचारात घेवूनच पदे भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . पदभरती प्रक्रिया संदभातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !