लिपिक , आरेखक , भांडारपाल , चालक , निरीक्षक , शिपाई , परिचर , चौकीदार अशा विविध पदांच्या तब्बल 16,185 पदांसाठी महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या मृदा व जलसंपदा विभागांमध्ये गट क व ड संवर्गातील 16,185 पदांसाठी पदभरती महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येणार आहेत .पदाचे नाव , पदसंख्या या संदर्भात सविस्तर महाभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट ड संवर्गामध्ये नाईक पदांच्या 245 जागा , शिपाई पदांच्या 2357 जागा , चौकीदार पदांच्या 1057 जागा , कालवा चौकीदार पदांच्या 784 जागा , प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकुण 182 जागांसाठी तर दप्तरी पदांच्या एकुण 06 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.नाईक245
02.शिपाई2357
03.चौकीदार1057
04.कालवा चौकीदार784
05.कालवा टपाली330
06.प्रयोगशाळा परिचर152
07.दप्तरी006

तर गट क  संवर्गातील महत्वाची रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य लिपिक55
02.आरेखक144
03.भांडारपाल68
04.सहाय्यक आरेखक191
05.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक2571
06.वरिष्ठ लिपिक705
07.अनुरेखक976
08.संदेशक190
09.टंकलेखक53
10.वाहनचालक824
11.कनिष्ठ लिपिक1968
12.सहाय्यक भांडारपाल181
13.दप्तरी कारकुन534
14.मोजणीदार951
15.कालवा निरीक्षक1471

गट क संवर्गांमध्ये एकुण 11 हजार 177 जागेसाठी तर गड ड संवर्गांमध्ये एकुण 5 हजार 8 जागेसाठी असे एकुण 16,185 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदभरती प्रक्रिया जाहीरात राज्य  शासनांच्या सुचनेनुसार , दि.15 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र नियोजन विभागामध्ये मेगाभरती 2023 ! Apply Now !

त्याचबरोबर मृदा व जलसंधारण विभागातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीचे गठन दिनांक 14 जुलै 2023 रोजी करण्यात आलेली आहे .

Leave a Comment