जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये कार्यालय सहाय्यक , डाटा एन्ट्री ऑपरेटर ,शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

Spread the love

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार आस्थापनेवर विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . पदांचे नाव आवश्यक पात्रता ,पदसंख्या, वेतनश्रेणी यासंदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूयात ..

कार्यालय सहाय्यक : कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , यामध्ये कायद्याच्या पदवीधारकास प्रथम प्राधान्य देण्यात येईल . त्याचबरोबर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासकीय मंडळ अथवा आयटीआय द्वारे घेतली जाणारी 40 शब्द प्रति मिनिट वेगाची इंग्रजी टंकलेखन आणि 30 शब्द प्रतिमिनिट वेगाची मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे . त्याचबरोबर एम एस सी आय टी / सी सी सी संगणक हाताळणी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 15,000/- रुपये वेतन देण्यात येणार आहे .

डाटा एन्ट्री ऑपरेटर : डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे ,यामध्ये कायद्याच्या पदवीधारकास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे . त्याचबरोबर इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन आणि 30 शब्द प्रतिमिनिट वेगाची मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच MSCIT / CCC संगणक हाताळणी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 15,000/- रुपये वेतन मान देण्यात येणार आहे .

हे पण वाचा : बस महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया !

शिपाई : शिपाई पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता सातवी पास असणे आवश्यक असणार आहे . सदर पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारास प्रतिमा 12,000/- रुपये वेतनमान देण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार या पत्त्यावर दि.13.06.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .

जाहिरात पाहा

Leave a Comment