महाराष्ट्र वनविभागांमध्ये वनरक्षक ( गट क संवर्ग ) पदांच्या तब्बल 2,138 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक व शारीरीक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन ( Online ) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Forest Department Recruitment For Forest Guard , Number of post – 2,138 ) सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
वनरक्षक ( गट क संवर्ग ) पदांच्या एकुण 2,138 जागांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण ( भुगोल , विज्ञान , अर्थशास्त्र ,गणित विषयासह ) असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवारांस मराठी भाषा लिहणे ,वाचणे , बोलणे येणे आवश्यक असणार आहे .
वरील पदांपैकी नागपुर वनवृत्तामध्ये वनरक्षकांची एकुण 277 पदे , चंद्रपूर वनवृत्तांमध्ये 122 जागा , गडचिरोली वनवृत्तांमध्ये 197 जागा , अमरावती वनवृत्तांमध्ये 250 जागा , यवतमाळ वनवृत्तांमध्ये 79 जागा , औरंगाबाद वनवृत्तामध्ये 83 जागा , धुळे वनवृत्तांमध्ये 246 जागा , नाशिक वनवृत्तांमध्ये 99 जागा , पुणे वनवृत्तांमध्ये 73 जागा , ठाणे वनवृत्तांमध्ये 460 जागा , कोल्हापुर वनवृत्तांमध्ये 249 जागा , असे एकुण 2,138 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विविध पदांसाठी मेगाभर्ती 2023
वेतनश्रेणी : वनरक्षक ( गट क ) पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार एस-7 नुसार 21,700-69,100/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन + इतर लागु असणारे वेतन , भत्ते अनुज्ञेय असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर दि.10.06.2023 पासुन ते दि.30.06.2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर भरतीसाठी उमेदवारांकडून आवेदन शुल्क म्हणून अमागास प्रवर्गाकरीता 1,000/- रुपये तर मागास वर्गीय /आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता 900/- रुपये माजी सैनिक उमेदवारांकरीता कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- राज्य कर्मचारी विमा महामंडळ मुंबई अंतर्गत , लिपिक ( कनिष्ठ / वरिष्ठ ) , लघुलेखक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती !
- विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 208 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- नाशिक येथे शिक्षण संस्थेवर पर्यवेक्षक , लिपिक , तांत्रिक सहाय्यक , बस चालक ,शिपाई , बस क्लीनर , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती !