महाराष्ट्र कारागृह विभागांमध्ये विविध पदांच्या वाढीव 2,000/- पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याकरीता राज्य शासनांच्या गृह विभागामधील वाढीव पदांस मंजुरी देण्यात आलेली आहे . यांमध्ये राज्यातील कारागृह विभाग 2000 नविन वाढीव पदवाटपाचा कारागृहनिहाय तपशिल पदभरती जाहीरातीमध्ये नमदु करण्यात आलेला आहे .
कारागृह विभाग हे गृह विभागांच्या अधिनस्त कार्यरत असून , राज्यांमध्ये वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाणे ज्यामुळे गुन्हेगारांना ठेवण्यासाठी काही वाढीव कारागृहे / कारागृहांचे युनिट वाढविण्यात आलेले आहेत .यामुळे सदर कारागृहास कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने , राज्य शासनांकडून राजपत्रित गट अ , राजपत्रित ब तसेच अराजपत्रित गट क मधील तब्बल 2,000 वाढीव पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे .
सदर वाढीव पदांनुसार राज्यांमध्ये सदर दोन हजार पदांवर महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सध्या राज्यांमध्ये 9 मध्यवर्ती कारागृह कार्यरत आहेत . या 9 मध्यवर्ती कारागृहांची अधिकृत्त बंदीक्षमता 15,506 ऐवढी आहे तर पाच वर्षाची एकुण सरासरी बंदीक्षमता 24,977 ऐवढी आहे , या बंदीक्षमेच्या प्रमाणाचा विचार केला असता यांमध्ये 4,160 एवढ्या प्रमाणत अधिकारी / कर्मचाऱ्यांची संख्या हवी आहे .
वाढीव पदांचे नावे – राजपत्रित अधिकारी गट अ मध्ये विशेष कारागृह महानिरीक्षक , अधिक्षक मध्यवर्ती कारागृह , अधिक्षक मध्यवर्ती कारागृह , मानस शास्त्रज्ञ , मनोविकृती शास्त्रज्ञ अशा पदांचा समावेश आहे . तर राजपत्रित गट ब संवर्गामध्ये अधिक्षक जिल्हा कारागृह वर्ग -2 , वैद्यकी अधिकारी वर्ग – 2 , स्वीय सहाय्यक / प्रशासकीय अधिकारी या पदांचा समावेश आहे .
तर अराजपत्रित गट क संवर्गामध्ये वैद्यकीय अधिकारी वर्ग – 3 , कार्यालयीन अधिक्षक , तुरुंग अधिकारी श्रेणी – 1 , तुरुंग अधिकारी श्रेणी -2 , मिश्रक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , तुरुंग अधिकारी , लिपिक , हवालदार , कारागृह शिपाई , परिचालक अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . मध्यवर्ती कारागृह निहाय व जिल्हा कारागृह निहाय वाढीव पदांची संख्या पाहण्यासाठी खालील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .