महानिरीक्षक, प्र.अधिकारी , तुरुंग अधिकारी , लिपिक ,हवालदार ,कारागृह शिपाई ,परिचालक इ.पदांच्या 2,000 हजार जागांसाठी मेगाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्य कारागृह विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल दोन हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत राज्य शासनांच्या गृह विभागांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे . सदर दोन हजार पदे ही बंदीक्षमतेनुसार  नविन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहेत . राज्यातील 9 मध्यवर्ती कारागृह , तसेच राज्यातील सर्व जिल्हा कारागृहे व विशेष कारागृहे किशोर कारागृहे तसेच इतर कारागृहांमध्ये वाढीव पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .

राजपत्रित अधिकारी संवर्गातील पदे / पदसंख्या : राजपत्रित अधिकारी संवर्गामध्ये अधिक्षक मध्यवर्ती कारागृह पदांच्या एकुण 02 पदांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे . मानस शास्त्रज्ञ पदांच्या एकुण 07 पदांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे . तर मनोविकृत्ती शास्त्रज्ञ पदांच्या एकुण 06 वाढीव पदांस मंजुरी देण्यात आलेली आहे .

राजपत्रित अधिकारी संवर्गाती पदे / पदसंख्या : अधिकक्षक जिल्हा कारागृह वर्ग -2 पदांच्या एकुण 7 नविन पदांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे . तर वैद्यकीय अधिकारी वर्ग -2 पदांच्या एकुण 9 जागांसाठी नव्याने मंजुरी देण्यात आलेली आहे . तर स्वीय सहाय्यक / प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकुण 02 पदांसाठी नव्याने मंजुरी देण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अराजपत्रित गट क संवर्गातीन पदे / पदसंख्या :  यांमध्ये वैद्यकी अधिकारी वर्ग -3 पदांच्या एकुण 26 जागा  , कार्यालय अधिक्षक पदांच्या एकुण 05 जागा , तुरुंग अधिकारी श्रेणी -1 पदांच्या 48 जागा , तुरंग अधिकारी श्रेणी – 2 पदांच्या एकुण 116 जागा , मिश्रक पदांच्या एकुण 21 जागा तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकुण 7 जागेसाठी नव्याने वाढीव पदे निर्माण करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 12 जागा , लिपिक पदांच्या 21 जागा , सुभेदार पदांच्या 56 जागा , हवालदार पदांच्या 277 जागा , कारागृह शिपाई पदांच्या 1370 जागा तर परिचालक पदांच्या एकुण 10 जागांसाठी नव्याने मंजुरी देण्यात आलेली आहे . या संदर्भात जिल्हा निहाय / कारागृहनिहाय नव्याने निर्माण करण्यात वाढीव पदांची संख्या पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

सदर वाढीव पदानुसार राज्य शासनाकडून लवकरच मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

जाहीरात पाहा

Leave a Comment