महाराष्ट्र वनविभागांमध्ये गट क संवर्गातील वनरक्षक या पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून अर्हता धारक उमेदवारांकडून विहील कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदासांठी आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी , पदसंख्या , अर्ज प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये वनरक्षक ( गट – क संवर्ग ) पदांच्या एकुण 2 हजार 138 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा विज्ञान किंवा गणित किंवा भुगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर अनुसुचित जमाती ( ST ) प्रवर्गातील उमेदवारांसाठी इयत्ता 10 वी अर्हताधाारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत .
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय दि.30.06.2023 रोजी अमागास प्रवर्गाकरीता किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .तर मागास / अनाथ / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरीता किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .तर प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे .
शारीरिक पात्रता उंची / छाती / वजन : पुरुष उमेदवारांकरीता उंची 163 से.मी असणे असणे आवश्यक आहे , तर महिला प्रवर्गाकरीता 150 से.मी असणे आवश्यक आहे . तर पुरुष उमेदवारांकरीता छातीचा घेर 79 से.मी तर 5 से.मी फुगवता आली पाहीजे .वजन हे वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे .
निवडीची पद्धत : ऑनलाईन अर्जातील माहीतीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 120 गुणांची ( एकुण 60 प्रश्न ) स्पर्धात्मक परीक्षा टी.सी.एस आयओएन कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल . यामध्ये मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बौद्धीक चाचण असे प्रत्येक 30 गुण एकुण 120 गुणांची परीक्षा होणार आहे . सदर वनरक्षक ऑनलाईन परीक्षेचा दर्जा हा इयत्ता 10 वी परीक्षेचा असणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !