PMC : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation Recruitment for Counselor & Laboratory Technician , Number Of Post Vacancy – 12 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
समुपदेशक : समुपदेशक पदांच्या 11 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी उत्तीर्ण तसेच मास्टर ऑफ सोशल वर्क ( MSW ) मास्टर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच एड्स विषयक समुपदेशन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे , सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा 21,525/- रुपये वेतनमान अदा करण्यात येणार आहे .
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातील शास्त्र शाखेतील बी.एस.सी व डी.एम.एल टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच एच.आय.व्ही रक्तचाचणी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल , सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 21,525/- वेतनमान अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र शुक्रवार पेठ , गाडीखाना पुणे 411002 या पत्त्यावर दि.13 जून 2023 पर्यंत अर्ज पाहोचेश अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026