DGHS : आरोग्य सेवा महासंचालनालय मध्ये गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 487 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

आरोग्य सेवा महासंचालनालय मध्ये विविध गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 487 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Directorate General Of Health Services Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 487 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या  : यांमध्ये गट ब आणि क संवर्गातील रिसर्च असिस्टंट , तंत्रज्ञ , प्रयोगशाळा परिचर , प्रयोगशाळा सहायक , इंसेक्ट कलेक्टर , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , आरोग्य निरीक्षक इ. पदांच्या 487 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी / 12 वी तसेच आयटीआय तसेच पदवीधर / बी.एस्सी / एम एस्सी / जी.एन एम / एम एस डब्ल्यु / इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 30.11.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे पदांनुसार 25 / 27 / 30 / 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://hlldghs.cbtexam.in/Home/index.html या संकेतस्थळावर दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 600/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला / अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 450/- रुपये परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment