केंद्र शासनांच्या शिक्षण मंत्रालय मार्फत इंडियन कॉन्सील ऑफ सोशल सायन्स रिसर्च मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. ( Indian Council Of Social Science Research , Ministry of Education Recruitmet For Assistant Director , Reasearch Assistant , Lower Division Clerk Post , Number of Post Vacancy – 35 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.सहाय्यक डायरेक्टर ( संशोधन ) [ Assistant Director Reaserch ] : सदर पदांच्या एकुण 08 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सामाजिक विज्ञान किंवा समकक्ष विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता लेव्हल -10 मध्ये 56,100-177,500/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरित करण्यात येतील .
02.संशोधन सहाय्यक ( Research Assistant ) : सदर पदांच्या 14 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह एम.ए अर्हता सोशल सायन्स विषयास उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता लेव्हल – 6 मध्ये 35,400-112,400/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरित करण्यात येतील .
03.कनिष्ठ लिपिक ( Lower Division Clerk ) : कनिष्ठ लिपिक पदांच्या 13 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी व इंग्रजी 35 श.प्र.मि टायपिंग / हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता लेव्हल -2 मध्ये 19,900-63,200/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरित करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://icssr.org/applications-are-invited-filling या संकेतस्थळावर दिनांक 05.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026