वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( finance department chha. Sambhajinagar ayukt recruitment for class c post , number of post vacancy – 42 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यामध्ये गट क संवर्गातील कनिष्ठ लेखापाल पदांच्या एकुण 42 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे कोणत्याही विद्यापीठातुन कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( age limit ) : उमेदवाराचे वय हे 19 वर्षापेक्षा कमी नसावेत तर खुला प्रवर्ग करीता कमाल वय हे 38 वर्षे तर मागास प्रवर्ग करीता कमाल वय हे 43 वर्षांपेक्षा अधिक नसावेत .

नोकरीची ठिकाण ( Job Location ) : धाराशिव , छ.संभाजीनगर , लातुर , बीड , परभणी , जालना , नांदेड , हिंगोली ( छ.संभाजीनगर विभाग )

हे पण वाचा : शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि.18.01.2025 पासुन ते दि.16.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment