नागपुर पालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 350 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nagapur Fire Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 350 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | 07 |
02. | उप अग्निशमन अधिकारी | 13 |
03. | चालक यंत्र चालक | 28 |
04. | फिटर कम ड्रायव्हर | 05 |
05. | अग्निशमन विमोचक | 297 |
एकुण पदांची संख्या | 350 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी तसेच स्टेशन अधिकारी आणि इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी तसेच स्टेशन अधिकारी आणि इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी तसेच आयटीआय , MSCIT तसेच 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 करीता : इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच राज्य अग्निशामक केंद्र , मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण / महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ / आखिल भारतीय स्वराज्य संस्था यांचेकडील कार्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
शारीरिक पात्रता : यांमध्ये पुरुष उमेदवारांकरीता उंची 165 से.मी तर छाती 81-86 से.मी असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये महिला उमेदवारांकरीता 162 से.मी उंची असणे आवश्यक असणार असून पुरुष व महिला उमेदवारांकरीता 50 कि.ग्रॅम वजन असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 27.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / आ.दु.घ उमेदवारांकरीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- Bhiwandi Nizampur : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मर्चंट सहकारी बँक अंतर्गत अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , पुणे , बीड जिल्हामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत अभियंता , लेखा सहाय्यक , सहाय्यक ( कायदा / प्रयोगशाळा ) , ग्रंथालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन ,सुतार , चालक , मल्टी टास्क ऑपरेटर इ. पदांसाठी महाभरती !