अग्निशमन विभाग मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी मोठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

नागपुर पालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 350 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nagapur Fire Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 350 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी07
02.उप अग्निशमन अधिकारी13
03.चालक यंत्र चालक28
04.फिटर कम ड्रायव्हर05
05.अग्निशमन विमोचक297
 एकुण पदांची संख्या350

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी तसेच स्टेशन अधिकारी आणि इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी तसेच स्टेशन अधिकारी आणि इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !

पद क्र.03 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी तसेच आयटीआय , MSCIT तसेच 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 करीता : इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच राज्य अग्निशामक केंद्र , मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण / महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ / आखिल भारतीय स्वराज्य संस्था यांचेकडील कार्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

शारीरिक पात्रता : यांमध्ये पुरुष उमेदवारांकरीता उंची 165 से.मी तर छाती 81-86 से.मी असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये महिला उमेदवारांकरीता 162 से.मी उंची असणे आवश्यक असणार असून पुरुष व महिला उमेदवारांकरीता 50 कि.ग्रॅम वजन असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn3.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 27.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / आ.दु.घ उमेदवारांकरीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment