महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांमध्ये फक्त चौथी पास पात्रता धारकासाठी पदभरती प्रक्रिया ! 23,736/- रुपये एवढा मिळेल पगार

Spread the love

महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये फक्त चौथी पास उमेदवाराकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .( Food Civil supplies and Consumer protection Department Recruitment for Driver Post ) पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया .

पदाचे नाव : वाहन चालक

पात्रता – उमेदवार हा भारतीय नागरिक असावा त्याचबरोबर उमेदवार हा किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर मराठी भाषा वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे. उमेदवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसावा ,वाहन चालकासोबत त्याचा वाहन चालवण्याचा परवाना त्याचे ओळखपत्र त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे .वाहनास अपघात झाल्यास व दुर्दैवाने वाहन चालकास गंभीर स्वरूपात इजा झाल्यास वाहनचालकास वैद्यकीय खर्चाची अथवा नुकसान भरपाईची कोणतीही दायित्व शासनाकडे राहणार नाही .

वयोमर्यादा : वाहन चालक पदाकरिता किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे ,तर कमाल वयोमर्यादा 58 वर्षापेक्षा अधिक असू नये .

अर्ज प्रक्रिया व आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली या पत्त्यावर दिनांक.10 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे .अर्जासोबत संपूर्ण कागदपत्रे त्याचबरोबर वाहन चालवण्याचा परवाना जोडणे आवश्यक आहे .सदर पद भरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment