मेगाभर्ती 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये संवर्ग ड / सफाई कामगार पदांच्या तब्बल 5,308 जागेसाठी महाभरती !

Spread the love

बृहन्मंबई महानगरपालिकामध्ये सध्या एकुण 10,000 रिक्त पदे आहेत , या रिक्त पदांपैकी अग्निशमन जवान पदांच्या 990 तर स्टाफ नर्स पदांच्या 550 जागेसाठी पदभरती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आलेली आहे . यामध्ये संवर्ग ड मधील सफाई कामगार पदांच्या एकुण 5,308 जागा रिक्त आहेत . या रिक्त जागेवर पालिका प्रशासनांकडून लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

राज्य सरकारच्या निर्देशांनुसार आता पालिका प्रशानांकडून दि.15 मार्च 2023 पर्यंत रिक्त पदांची पदभरतीस सुरुवात करण्यात येईल .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील पालिका प्रशासनांमध्ये 40 हजार रिक्त जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल . यामध्ये मुंबई पालिका प्रशासनांमध्ये 10 हजार पदे रिक्त आहेत . याबाबत पालिका प्रशासनांकडून या अगोदरच रिक्त पदांचा खुलासा करण्यात आलेला आहे .

सध्या पालिका प्रशासनांकडून अत्यावश्यक असणारे पदे क्रमाने भरले जात आहेत . अग्निशमन , व आरोग्य विभागातील रिक्त पदांवर पदभरती सुरु करण्यात आलेली आहे . पावसाळ्यांमध्ये पालिकेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची अधिक गरज भासते . याकरीता सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तब्बल 5,308 जागेवर मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

कोरोना महामारीमुळे पालिका प्रशासनांमध्ये , रिक्त् पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नव्हती . परंतु आता राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार , पदभरती प्रक्रियेस वेग येणार आहे .यामध्ये सफाई कर्मचारी , शिपाई , पहारेकरी , माळी , स्मशान पहारेकरी इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत .

पात्रता – वर्ग – ड / सफाई कर्मचारी कर्मचारी पदाकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार हा शारिरीक दृष्ट्या सक्षम असणे असणे आवश्यक आहे .उमेदवाराचे किमान वजन 50 कि.ग्रॅम असणे आवश्यक आहे .

जाहिरात पाहा

शासकीय भरती / योजनांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment