महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांकरीता मेगाभरती जाहीर ! विभागानिहाय रिक्त जागा पाहा .

Spread the love

महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांच्या एकुण 9,640 जागांपैकी 2071 अधिक वाढीव जागांवर येत्या 20 डिसेंबरला मेगाभरती जाहीर करण्यात येणार आहे .जाहीरात प्रसिद्ध करण्याकरीता वन विभागांकडुन विहीत नमुन्यात माहीती मागविण्यात आले आहे .सदर पदभरतीप्रक्रियामध्ये स्थानिक पैसा उमेदवारांनाही विशेष आरक्षण देण्यात येणार आहेत .

वनविभागांकडुन वनरक्षक पदांच्या भरतीकरीता वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून , जाहीरात ही दि.20 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात येणार आहे . तसेच अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 31.12.2022 असेल . तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ही 30 जानेवारी 2023 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे .

वनवृत्तानुसार रिक्त वनरक्षक पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .

नाशिक विभाग -90 , गडचिरोडी विभाग – 233 , अमरावती – 252 , यवतमाळ – 100 , औरंगाबाद – 109 , धुळे – 244 , पुणे – 82 , ठाणे – 384 , कोल्हापुर – 220 असे एकुण महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांच्या एकुण 2071 पदे अधिक काही पदे वाढविण्यात येणार असून साधारणपणे 2500 पदांकरीता मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

पात्रता – वनरक्षक पदाकरीता उमेदवारा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर MSCIT कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

वेतनमान – वनरक्षक पदांकरीता सहाव्या वेतन आयोगानुसार 5200-20200 ग्रेड पे 1800 या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरित करण्यात येते . तसेच इतर वेतन + भत्ते लागु असतात .


Leave a Comment